संभाजी पुलावरुन जात असाल तर ही बातमी वाचाच !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पुणे : तुम्ही दुचाकीवरुन टिळक चौकातून संभाजी पुलावरुन डेक्कनकडे जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. तुम्हाला वाहतूक पोलिस अडवतील, अशी भिती असेल, तर घाबरू नका. कारण संभाजी पुल आता दुचाकींना वाहतूकीसाठी कायमस्वरुपी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता संभाजी पुलावरुन आता निर्धास्तपणे जा, तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. 

पुणे शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या संभाजी पुल अनेक वर्षांपासून दुचाकींना वाहतूकीसाठी बंद होता. पाऊस, वाहतूक कोंडी अशा काही तत्कालीक कारणांमुळे हा पुल तात्पुरत्या स्वरुपात कधी तरी दुचाकींसाठी खुला करण्यात येत होता. त्यानंतर पुन्हा टिळक चौक व खंडुजीबाबा चौक या दोन्ही चौकांमध्ये पुण्यात नव्याने आलेला एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावरुन गेला की, दोन्ही बाजुंनी दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या जाळ्यात तो हमखास सापडल्याशिवाय राहात नव्हता. वर्षानुवर्षे हे चित्र सुरू होते. परंतु यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि त्यामध्ये दररोज अडकणाऱ्या लाखो दुचाकीस्वारांची समस्या वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी समजून घेतली. 

मागील आठ दिवसांपासून संभाजी पुलावरुन दुचाकींना कायमस्वरुपी प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली. त्याबाबतच्या सुचना पोलिस उपायुक्त देशमुख यांनी दिल्या. त्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणीही करण्यात आली. पुलाच्या दोन्ही बाजुंना लावण्यात आलेले 'दुचाकींना बंदी'चे फलक हटविण्यात आले. त्यामुळे आता दुचाकीस्वार निर्धास्तपणे डेक्कनच्या दिशेने व डेक्कन, कर्वेनगरहून मध्यवर्ती भागांमध्ये येण्यासाठी संभाजी पुलाचा वापर करु शकतात.

Web Title: Sambhaji pool is permanently open for biking in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live