छत्रपती संभाजी उद्यानात गनिमी काव्याने बसवला संभाजी राजेंचा पुतळा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

चौथऱ्यावर चिटकवलेल्या कागदावरील आशय :

!! जय शिवराय !! 
!! जयोस्तु मराठा !!  
!! जय शंभुराजे !!
शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती संभाजी उद्यानातील गनिमी काव्याने हा संभाजीराजेंचा पुतळा बसवला आहे. जर हा पुतळा काढायचा शिवद्रोह कोणी केला तर, तमाम शिवभक्त, मराठा-मावळे महाराष्ट्र पेटवतील त्याला आम्ही जबाबदार नाही.
- आपला शिव-शंभू भक्त-गणेश कारले (स्वाभिमान संघटना, खेड तालुका अध्यक्ष)

पुणे : पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानात शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर गनिमी काव्याने हा संभाजीराजेंचा पुतळा बसवला आहे. या उद्यानात महापालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठीच काम आणि चौथरा बांधून पुर्ण झाला आहे. एवढंच नव्हे तर जो पुतळा बसविण्यात येणार आहे तो पुतळा देखील तयार झाला आहे.

दरम्यान काल(ता.19) मध्यरात्री अचानक काहीजणांनी संभाजी उद्यानातील चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा एक छोटा पुतळा नेऊन ठेवला आहे. हा पुतळा इथं नेऊन ठेवणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणाने त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतला असून हा पुतळा येथुन हलवल्यास गंभीर परिणाम होतील अशा आशयाचा मजकूर लिहिलेला कागद चौथऱ्यावर चिकटवला आहे.

खरं तर महापालिकेकडून बसवण्यात येणारा पुतळा भव्य असुन छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथाची रचना करतानाची प्रतिमा त्यातुन साकारण्यात आलीय. येत्या काही दिवसांत या पुतळ्याच अनावरण करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देखील मिळवण्यात आल्या आहेत. याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा दोन वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर संभाजी उद्यानात महापालिकेकडून चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवले जातात. मात्र तरीही चौथऱ्यावरवर हा पुतळा नेऊन ठेवल्याने खळबळ उडालीय.

चौथऱ्यावर चिटकवलेल्या कागदावरील आशय :

!! जय शिवराय !! 
!! जयोस्तु मराठा !!  
!! जय शंभुराजे !!
शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती संभाजी उद्यानातील गनिमी काव्याने हा संभाजीराजेंचा पुतळा बसवला आहे. जर हा पुतळा काढायचा शिवद्रोह कोणी केला तर, तमाम शिवभक्त, मराठा-मावळे महाराष्ट्र पेटवतील त्याला आम्ही जबाबदार नाही.
- आपला शिव-शंभू भक्त-गणेश कारले (स्वाभिमान संघटना, खेड तालुका अध्यक्ष)

Web Title: Sambhaji Raje statue installed secretly in Chhatrapati Sambhaji Park
 


संबंधित बातम्या

Saam TV Live