समृद्धी महामार्गाला भ्रष्टाचाराचं ग्रहण?

समृद्धी महामार्गाला भ्रष्टाचाराचं ग्रहण?

बहुचर्चित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम जोमात सुरुंय. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच त्याला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलंय. वर्धा जिल्ह्यातल्या केळझर शिवारात कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीतून एक दोन नव्हे तर तब्बल 103 एकर जमीनीतून मुरूमाची चोरी झालीय.

केळझरमध्ये कोझी प्रॉपर्टीजची जवळपास एक हजार एकर जमीन आहे. समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमी भाग या जमिनीतून जातो. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं नेमलेल्या उपकंत्राटदारांपैकी एमपी कन्स्ट्रक्शन कंपनीला कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीवर 1.50 किमी बांधकामाचं उपकंत्राट मिळालंय.

गेल्या महिन्यात कोझी प्रॉपर्टीजच्या अभियंत्यांनी या जमिनीला भेट दिली, त्यावेळी जवळपास 103 एकर जमिनीवर 5 ते 30 फूट खोल खड्डे करून मुरुम चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. मशनरीच्या साहाय्याने हे खोदकाम करण्यात आलंय. याप्रकरणी ऍफकॉन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार, तसंच एम पी कन्स्ट्रक्शचे सब काँट्रॅक्टर आशिष दप्तरी यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

हा मुरुम 20 लाख ब्रास इतका असून, त्याची किंमत जवळपास 100 कोटी असल्याचं समजतंय.  विशेष म्हणजे समृद्धी महामार्गासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारनं खासगी जमिनीतून मुरुम काढल्यास रॉयल्टी माफ केलीय. मात्र त्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता एमपी कन्स्ट्रक्शननं हा गौडबंगाल केलाय. चौकशीअंती यात बडे मासे देखील गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होतीय. 

WebTitle : marathi news samruddhi highway under clouds of corruption 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com