मराठीला चांगले दिवस; इंग्रजी शाळांना तब्बल १,१६९ मुलांकडून ‘बाय-बाय’

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

सांगली - ‘इंग्रजी शाळांतील शिक्षणच सर्वोत्तम’ या भावनेत अनेक वर्षांत बरेज जण वाहून गेले. काहींनी मराठी शाळांच्या दर्जाला घाबरून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. पण यंदा त्यात मोठा बदल झाला असून तब्बल १,१६९ मुलांनी इंग्रजी शाळांना ‘बाय-बाय’ करत मराठी शाळेचा रस्ता धरला आहे. 

गेल्यावर्षीपासून याचा परिणाम दिसत असून, इंग्रजी शाळांकडे वळलेली पावले पुन्हा मराठीचा रस्ता तुडवू लागली आहेत. त्यातही जिल्हा परिषदेची शाळाच साऱ्यांना खुणावतेय, हे विशेष. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांतून माहिती मागवली. त्यात इंग्रजी शाळांतून मराठी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जिल्हा परिषद शाळांचा उत्साह वाढवणारा आहे. त्यामागच्या कारणांचा शोध घेताना जिल्हा परिषद शाळांतील सुधारणांबद्दल पालकांत विश्‍वास वाढल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात डिजिटल शाळा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, वाढते उपक्रम याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकांच्या या दृष्टीकोनाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Marathi School Demand Increase Education

संबंधित बातम्या

Saam TV Live