(VIDEO) सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊस वाहतूक रोखली. वाहतूक करणाऱ्या वाहनांची टायर पेटवले. कारखाने बंद करण्याचा इशारा देऊनही कारखाने सुरूच ठेवल्याने आंदोलन चिघळले 

काल रात्री इस्लामपूर येथील कामेरी गावात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस जाळल्याची घटना घडली आहे. तसेच आष्टा आणि मिरज तालुक्यातही टायर जाळल्याचे प्रकार घडले आहेत. वड्डीमध्ये ट्रॅक्टर जाळण्यात आले. एकंदरीतच जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलन पेटले आहे. दोन ट्रॅक्टर आणि कारखान्याचे ऑफिस जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केले आहे.

WebTitle : marathi news sangali agitation for FRP of sugarcane goes violent 

संबंधित बातम्या

Saam TV Live