आश्रमशाळेतल्या सात मुलींवर संस्थाचालकाकडूनच लैंगिक अत्याचार; सांगलीतील धक्कादायक प्रकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सांगली जिल्ह्यातल्या कुरळपमधील आश्रमशाळेतल्या सात मुलींवर संस्थाचालकाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केलीय,

तर महिला शिपायाला ताब्यात घेतलंय. वाळवा तालुक्यातल्या कुरळपमधील मिनाई आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. पोलिसांनी आज या आश्रमशाळेवर छापा टाकत संस्थाचालक अरविंद पवार याला अटक केलीय. काही पीडित मुलींनी आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत पालकांना कल्पना दिली होती.

यावरून पोलिस आणि पालकांनी अचानकपणे आश्रमशाळेमध्ये तपासणी करून याबाबत चौकशी केली असता संस्थाचालक अरविंद पवार याच्याकडून शाळेतल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live