सांगलीत अंडी लिंबू, मिरजेत राक्षसी बाहुल्या..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सांगलीतील वॉर्ड क्रमांक 19 मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दोन लिंबू आणि अंडी, तर काही ठिकाणी एक लिंबू आणि दोन अंडी ठेवून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय.

उद्या सांगलीमध्ये मतदान होतंय. स्फूर्ती चौकात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला असून काळी जादू करुन आणल्याचा संशय लोकांनी व्यक्त केलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मिरजेत लटकणाऱ्या राक्षस बाहुलीच्या प्रतिकृतीने खळबळ उडाली होती. मिरजेच्या मिशन मार्केट चौकात एका अज्ञात इसमाने विजेच्या तारेला एक राक्षस मुखी तंत्र मंत्र असणारी बाहुली लावली होती. त्यामुळे  या बाहुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असुन स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

WebTitle : marathi news sangali election ward number 19 superstition jadutona 

संबंधित बातम्या

Saam TV Live