सांगलीत महापूर; नदीकाठच्या ३१ हजार लोकांचं स्थलांतर

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

रस्त्यावर गाड्या नाही होड्या
कृष्णा नदीला पूर आल्यानं रस्त्यांवर पाणीच पाणी

सांगलीत २००५ नंतर इतका भयानक पूर आलाय. कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आल्यानं नागरिकांचं जीणं कठिण झालंय. कृष्णेची पातळी जवळपास 51 फुटांवर पोहोचलीय. त्यामुळं शहरातल्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी घुसलंय. त्यामुळं सांगली इस्लामपूर, सांगली कोल्हापूर मार्गे कर्नाटककडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय. त्यामुळं वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झालाय. आत्तापर्यंत नदीकाठच्या सुमारे 31 हजारहून अधिक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यात एनडीआरएफला पाचारण करण्यात आलंय. 

संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि चांदोलीच्या कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळं कृष्णा आणि वारणा नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय. शहरातील मारुती चौक, शिवाजी मंडळ, टिळक चौक या ठिकाणी पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळं हा संपूर्ण परिसर पुराच्या वेढ्यात अडकलाय. 

 

 

मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. सुमारे दीडशेहून अधिक गावांमध्ये महापुराचं पाणी शिरलंय. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पूर्व भागातल्या महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर केलीय. 

सांगलीतली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. महापुरामुळं प्रत्येकाच्या मनात धडकी भरलीय. महापुराचं संकट लवकरात लवकर टळू दे अशी प्रार्थना केली जातेय.

WebTitle : marathi news sangali flodd hits sangali thirty one thousands citizens migrated 


संबंधित बातम्या

Saam TV Live