सांगलीतील चार बंधारे गेले पाण्याखाली...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जुलै 2019

सांगली - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा, वाळवा, पलूस तालुक्‍यांत आज पावसाची संततधार सुरूच राहिली. धरण क्षेत्रातील पावसामुळे वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.  चांदोली धरणाकाठी प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 

सांगली - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा, वाळवा, पलूस तालुक्‍यांत आज पावसाची संततधार सुरूच राहिली. धरण क्षेत्रातील पावसामुळे वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.  चांदोली धरणाकाठी प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 

काखे-मांगले, आरळा-सित्तूर या दोन पुलांसह चार बंधारे पाण्याखाली गेले. आयर्विन पुलाची कृष्णा नदीच्या पाणीपातळी २४ तासांत १३ फुटाने वाढून रात्रीपर्यंत पाणीपातळी ३० फूट झाली आहे. पलूस, कडेगाव, मिरज भागात पावसाची संततधार सुरू राहिली. पूर्व भागातील अनेक गावांत पावसाच्या सरी बसरल्या. सांगली, मिरज शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने जनजीवन विस्कळित झाले.

बंधारे गेले पाण्याखाली... 
वारणा नदीवरील काखे-मांगले आणि कोकरूडचा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे दोन्ही पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय शिगाव, दुधगाव, समडोळी येथील बंधारे पाण्याखाली गेले. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारा मार्ग बंद झाला. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढच होत राहण्याची शक्‍यता आहे. कृष्णा नदीवरील कसबे डिग्रज, भिलवडी, बहे, नागठाणे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

वारणा नदीच्या पाण्यामुळे चार पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा नदीवरील औदुंबर मंदिरात पाणी शिरले असून सभामंडपापर्यंत आले आहे. अंकलखोप-आमणापूर पुलाला पाण्याची थाप लागली आहे. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी व अन्यत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कापूसखेडला भिंत कोसळून महिला ठार झाली आहे. 

चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. येथे दिवसभरातही ३५ मिलिमीटर पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता चांदोली धरणात २८.१२ टीएमसी पाणीसाठा होता. कोयना धरण परिसरात चोवीस तासांत १५० मिलिमीटर पाऊस झाला. सकाळपासून पाचपर्यंत १०५ मिलिमीटर पाऊस पडला. सध्या धरणात ७२.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महाबळेश्वरला गेल्या ३६ तासांत १९३, नवजाला ४२६ मिलिमीटर पाऊस पडला. रात्री उशिराही धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच होता. 

कृष्णा नदीवरील विविध पुलांच्या ठिकाणची सायंकाळी पाच वाजताची पातळी फुटात अशी- कृष्णा पूल कऱ्हाड ३५, भिलवडी- ३५, आयर्विन पूल सांगली २९ व अंकली पूल हरिपूर ३० व नृसिंहवाडी-४५. 

 Web Title: Heavy rains flood situation in Sangli


संबंधित बातम्या

Saam TV Live