सांगलीत अंदाजे 55 ते 60 टक्के तर जळगावात 50 टक्के मतदान; 3 ऑगस्टला निवडणुकीचा निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडलं. सांगलीत 55 ते 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर जळगावमध्ये अंदाजे 50 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येतंय.

सांगलीत 20 प्रभागातील 78 जागांसाठी 544 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं. इथं 451 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर जळगावमध्ये 75 जागांसाठी 469 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. याठिकाणी 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी दोन्ही ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सांगलीत प्रभाग क्रमांक 15च्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रावरून गोंधळ झाल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर जळगावात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं. या निवडणुकीचं वैशिष्ट्य़ म्हणजे यावेळी पहिल्यांदाच मतदान केंद्रावर उमेदवारांच्या कुंडल्या पाहायला मिळत होत्या. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live