कोण जिंकणार सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिका 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणूक निकालाकडे लागलं आहे. वर्षभरात होणाऱ्या निवडणुका आणि सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारा मराठा मोर्चा, यांचं प्रतिबिंब निकालावर पडतं? की फक्त स्थानिक मुद्दे आणि स्थानिक राजकारण या निवडणुकीवर प्रभाव पाडेल, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मतमोजणीसाठी सहा मत मोजणी कक्ष तयार कंरण्यात आले आहेत. या सहा मतमोजणी कक्षात जवळपास 300 कर्मचारी मतमोजणीची मुख्य भूमिका पार पाडणार आहेत. 11 वाजेपासून निवडणूकीचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगावातही मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

WebLink : marathi news sangali kupwad miraj jalgaonmunicipal corporation election result 

संबंधित बातम्या

Saam TV Live