सांगलीमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन; ऑपरेशन दरम्यान स्फोटकं बनवण्याचं सापडलं साहित्य

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली जिल्ह्यातील जत शहरातील सातारा रोड आणि उमराणी रोडवर असलेल्या दोन्ही पारधी तांड्यावर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी कोबिंग ऑपरेशन राबवलं.

सांगली जिल्ह्यातील जत शहरातील सातारा रोड आणि उमराणी रोडवर असलेल्या दोन्ही पारधी तांड्यावर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी कोबिंग ऑपरेशन राबवलं.

कोबिंग ऑपरेशन दरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या घराची कसून झडती घेतली. यावेळी एका पोत्यात जिलेटीन कांडया, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. उमराणी रोडवरील तांडयातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील सहा मोटर सायकली मिळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्यात.
WebTitle : marathi news sangali police combing operation raw material of explosives found 

संबंधित बातम्या

Saam TV Live