सांगलीत बर्फवृष्टी तर विदर्भात उन्हाने लाही लाही..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगलीतल्या गुढे पाचगणी पठारावर गेलात तर तुम्हाला शिमल्यात पोहोचल्याचा अनुभव येईल. सांगलीत बर्फवृष्टी झालीय. शिराळा परिसरात ढगाळ वातावरण होतं. संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गाराही पडल्या. त्यामुळे बर्फाचे थर साठले. अचानक झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रहिवाश्यांना उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला. 

दरम्यान, विदर्भात मात्र सूर्य आग ओकताना दिसतोय. विदर्भाचा पारा चाळीशीपार गेलाय. अकोल्यात 42 अंश तापमानाची नोंध झालीये. तर चंद्रपूरातही पारा 44 अंशावर गेलाय.. चंद्रपुरातलं तापमान हे देशातील सर्वाधिक तापमान आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live