(Video) ... म्हणून या गावात कुणीही गादीवर झोपत नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

 सांगली जिल्ह्यातील वळसंग गावात तुम्हाला एकही  दुमजली इमारत दिसणार नाही..कारण गावातील मंदिराच्या कळसापैक्षा अधिक उंच घर असू नये अशी इथंली प्रथा आहे.. जर कुणी कळसापेक्षा उंच घर बांधलं तर अनर्थ घडतो अशी आख्यायिका सांगितली जाते.

गावात दोन मंदिरं आहेत. हनुमानाचं आणि ग्रामस्थांच श्रद्धा स्थान असलेल्या केंचरायचं. केंचराया मंदिराचा कळस सर्वात उंच असून या कळसापेक्षा उंच इथं एकही घरं नाही

इतकचं नव्हे तर इथं गावातील मुलीचं दुसऱ्या गावात लग्न झाल्यास. त्या मुलीच्या तीन पिढ्यांचं जावळ हे वळसंगमधील केचरायाच्या मंदिरातच  करावं लागतं.

याशिवाय इथं मंदिरातील गावात फक्त महिलांना प्रवेश आहे.
यातील आणखी एक प्रथा म्हणजे केचराया देव गादीवर विराजमान असल्यानं गावात कुणीही गादी वापरत नाही इतकचं काय लग्नात गादी भेट म्हणून दिली जात नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live