सांगलीतील वैद्यमापन कार्यालय संभाजी ब्रिगेडने फोडले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 मे 2018

सांगली - जिल्हाधिकारी कार्यालयातील वैद्य मापनशास्त्र कार्यालय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज फोडले. दुधाचे संकलन हे लिटरमध्ये केले जावे याबाबत वारंवार तक्रार करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील वैद्या मापनशास्त्र विभागाने याकडे दुर्लक्ष केले. या विरोधात संभाजी ब्रिगेडने कार्यालय फोडले.

प्राथमिक दूध संकलन केंद्रात संकलन हे इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्यावर केले जाते. यात दुध उत्पादकांचे नुकसान होते.  याबाबत वारंवार वैद्य मापनशास्त्र विभाग आणि  जिल्हाधिकाऱ्यांकडे संभाजी ब्रिगेडने तक्रार केली होती. दुधाचे संकलन हे लिटरमध्ये केले जावे अशी त्यांची मागणी होती. पण गेल्या सहा महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही  कारवाई न केल्याने या विरोधात संभाजी ब्रिगेडने उग्र आंदोलन करत वैद्य मापनशास्त्र कार्यालय फोडले. 

प्राथमिक दुध केंद्रावर दुध संकलन लिटरमध्ये न होता त्याचे वजनकाट्यावर मोजमाप करून संकलन केले जाते. दुध हा द्रव पदार्थ आहे. त्याचे मोजमाप हे लिटरमध्ये होणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. यात वजन व मापीमध्ये 100 एमएलचा फरक पडतो. याचा फटक दुध उत्पादकांना बसत आहे. या विरोधात आम्ही हे आंदोलन छेडले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live