खानापूर तालुक्यात अंगणातील भिंत कोसळून ३ महिलांचा मृत्यू, १ जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 मार्च 2019

सांगली : उकाडा असल्याने अंगणात झोपणे सांगलीतील तीन महिलांच्या जीवावर बेतले आहे. शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 

सांगलीत मोही गावात रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हौसाबाई विष्णू खंदारे (वय 80 वर्ष), कमल नामदेव जाधव (वय 50 वर्ष), सोनाबाई विष्णू खंदारे (वय 50 वर्ष) अशी मृत महिलांची नावे असून या माय-लेकी आहेत.

रात्री प्रचंड उकाडा असल्याने हे सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते. झोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूला शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अचानक कोसळली. यात भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींच्या डोक्यावर ढिगारा कोसळला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सावित्री तुळशीराम हसबे (वय 45 वर्ष) या जखमी आहेत. 

पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. उत्तरीय तपासणी साठी मृतदेह करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण मरण पावलेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सावंत करीत आहेत.

Web Title: three woman killed as compound wall collapse in mohi village

संबंधित बातम्या

Saam TV Live