ऐन पावसाळ्यात गुलाबी थंडीचा अनुभव; शिमला, कुलू-मानली नाही तर सांगलीत पडलेय कडाक्याची थंडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

ऐन सप्टेंबर महिन्यात सांगलीकर सध्या गुलाबी थंडी अनुभवतायत. पहाटेपासूनच सांगली शहरावर धुक्याची चादर पसरल्याने, नागरिक चांगलेच गारठले.

हवेत गारवा वाढल्याने थंडीचा जोर अधिक आहे. शहरात पडलेल्या धुक्यामुळे परिसरातील दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली.

वातावरणातील या बदलामुळे सांगलीकरांनी ऐन पावसाळ्यातच  हिवाळ्याचे विहंगम वातावरण अनुभवले. सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात आज गर्द धुके पडले..

तसंच शहरातील गणपती मंदिर आणि कृष्णा नदी परिसर या गर्द धुक्यात हरवून गेला होता.

संबंधित बातम्या

Saam TV Live