आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी : चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 एप्रिल 2019

 सांगली - आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले.

सांगली  येथे  श्री. पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई आणि बापट मळा परिसरात मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांच्या भेटी  घेतल्या व भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

यापूर्वी मी मार्निगवाॅक करणाऱ्यांना एकदोनदा भेटण्यासाठी आलो होतो. सांगली महानगरपालिका आपल्या सहकाऱ्यामुळे एकहाती जिंकता आली आहे. सांगली पालिका जिंकली म्हणजे आता मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवायला काहीच हरकत नाही. 

- चंद्रकांत पाटील, महसुलमंत्री

श्री. पाटील म्हणाले, चौकीदारच्या भीतीने सर्व विरोधक एकत्र आल्याने ही निवडणूक कठीण झाली आहे. देशात विशेषतः उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यामुळे लोकसभेची निवडणूक कठीण झाली आहे. त्यामुळे भाजप 300 च्यावर जागा जिंकेल असे वृत्त येत नाही. भाजप 240 किंवा 250 पर्यंत जाईल आणि उर्वरित सहयोगीपक्ष असे सरकार येईल. यासाठी या निवडणूकीमध्ये एक एक सीट महत्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Loksabha 2019 Minister Chandrakant Patil comment

संबंधित बातम्या

Saam TV Live