सांगलीला पुन्हा एकदा महापुराचा धोका, पूरस्थितीत घर खाली न करणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे 

साम टीव्ही
शनिवार, 20 जून 2020
  • सांगलीला पुन्हा एकदा महापुराचा धोका 
  • पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोटींचं प्रात्यक्षिक 
  • पूरस्थितीत घर खाली न करणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे 

सांगलीला पुन्हा एकदा महापुराचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केलीय.

सांगलीकरांनी गेल्या वर्षी महाभयंकर पूर अनुभवला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालंय. सांगली महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा आता सक्रीय झालीय. कृष्णा नदीपात्रात अग्निशमन दलाच्या ९ यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्यात. या बोटींचं प्रात्यक्षिक आणि तपासणीही करण्यात आली. सांगलीच्या माई घाटावर हे प्रात्यक्षिक पार पडलं. इतंकच नाही तर पूर आल्यास त्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. 

कृष्णेची पाणी पातळी २५ फुटांवर येताच लोकांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं, असं आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलंय. तसं न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय. 

तर एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे पुन्हा एकदा पुराची भीती, अशा कात्रीत सांगलीकर सापडलेयत.  

दरम्यान, कृष्णा नदीपात्राची आकडेवारी सांगणारी पाणी पूरपट्टी रंगवण्याचं कामही सुरू करण्यात आलंय. गेल्या वर्षीच्या पुरात ही पट्टी पुसली गेली होती. कृष्णेच्या पातळीत किती वाढ झालीय, हे या पूरपट्टीवरून कळतं. त्यामुळे हे रंगकाम तातडीनं हाती घेण्यात आलंय. (FEED / NIGHT / SANGALI POORPATTI)
एकूणच, गेल्या वर्षीच्या महापुरानं केलेलं नुकसान लक्षात घेता यावेळी प्रशासनानं आधीच खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live