शिवसेना दुष्काळग्रस्त चारा छावणी मधील शेतकऱ्यांना देणार एक वेळचे जेवण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

सांगोला : जो पर्यंत राज्यात पाऊस पडून चारा छावण्या बंद होत नाहीत तो पर्यंत शिवसेना चारा छावणी मधील शेतकऱ्यांना जेवण देईल अशी घोषणा  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सांगोला येथे केली. शिवसेनेचा या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील दुष्काळी भागात पाहणी करून तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न  अडचणी जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज सांगोल्यातील गोडसेवाडीतील चारा छावणीला भेट दिली. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत, आमदार नारायण पाटील, समन्वय प्रमुख शिवाजीराव सावंत उपस्थित होते चारा छावणीतील शेतकऱ्यांना शिवसेना एक वेळचे जेवण आणि चहा देणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोनशे चारा छावणी तील पशुपालकाची जेवणाची अडचण होऊ नये, ही काळजी शिवसेना घेत आहे. 

शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये. यापूर्वी फक्त एकदा 'शिवसेना' हा विचार मनात आणा आणि हाक मारा... पण मृत्यू ला कवटाळू नका, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

Web Title : One-time meal for farmers from Shivsena 

संबंधित बातम्या

Saam TV Live