मला तुझा अभिमान आहे, शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाचं भावनिक टि्वट

मला तुझा अभिमान आहे, शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाचं भावनिक टि्वट

नवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर सानिया मिर्झाने भावनिक ट्विट करत तु जे काही आतापर्यंत मिळविले आहेस याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे.

‘Every story has an end, but in life every ending is a new beginning’ @realshoaibmalik u have proudly played for your country for 20 years and u continue to do so with so much honour and humility..Izhaan and I are so proud of everything you have achieved but also for who u r

— Sania Mirza (@MirzaSania) July 5, 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर शोएबने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय शोएबने गेली 20 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले. 2007 ते 2009 दरम्यान तो पाकिस्तानचा कर्णधारही होता. 1999 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शोएबने वनडेमध्ये तर 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2019 च्या विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शोएबने 2015 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2018 मध्ये शंभर ट्वेंटी-ट्वेंटीचे सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला होता. त्याने निवृत्तीनंतर ट्विट करताना म्हटले होते, की मी आज एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत  आहे. मला आतापर्यंत पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.

Today I retire from One Day International cricket. Huge Thank you to all the players I have played with, coaches I have trained under, family, friends, media, and sponsors. Most importantly my fans, I love you all#PakistanZindabad pic.twitter.com/zlYvhNk8n0

— Shoaib Malik (@realshoaibmalik) July 5, 2019

शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने भावनिक टि्वट करत म्हटले आहे, की प्रत्येक कथेला शेवट असतो, पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली 20 वर्ष अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळलास. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे.

Mainstay of Pakistan team's ODI middle order
Former captain
7534 runs
9 centuries
158wickets
98 catches
One wonderful career
Thank you @realshoaibmalik!#ThankYouMalik #MightyMalik #CWC19 pic.twitter.com/TWiX1hlhDI

— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 6, 2019

Web Title: Sania Mirza tweet after Shoaib Malik Pakistan stars ODI retirement

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com