नोटांना सॅनिटायझर लावताय..सावधान !

साम टीव्ही
गुरुवार, 11 जून 2020
  • नोटांना सॅनिटायझर लावताय..सावधान !
  • सॅनिटायझरमुळे खराब होतायेत नोटा 
  • सॅनिटायझरमुळे उडतोय नोटांचा रंग 

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकजण खबरदारी घेतोय. काही व्यापारी ग्राहकांकडून नोटा घेतल्यानंतर त्यावर सॅनिटायझर स्प्रे मारतायेत. मात्र त्यामुळे एक नवीन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. काय आहे हे संकट?

कोरोना संकटामुळे सारेच जण धास्तावलेत. मास्क, सॅनिटायझर हे आपल्या जिवनाचा भाग बनलेत. बहुतेक जण कपड्यांवर, वापरातल्या वस्तूंवर इतकच नाही तर नोटांवर सुद्धा स्प्रेची फवारणी करतात. विशेष करून खबरदारीचा उपाय म्हणून दुकानदार, व्यापारी नोटांवर सर्रासपणे सॅनिटायझर स्प्रेचा मारा करू लागलेत. पण त्यामुळे नोटा खराब होऊ लागल्या आहेत. नोटांचा रंग उडू लागलाय. सॅनिटायझरचा अतिवापर होत राहिला तर हळहळू चलनी नोटा बाद होऊ शकतात अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. 

सर्वाधिक नोटांची देवाणघेवाण बँकेत होत असते. मात्र नोटांमुळे संसर्ग होतो असं अद्याप लक्षात आलेलं नाही तसच आरबीआयनं देखील तशा सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नोटांऐवजी हातालाच सॅनिटायझर लावा असं आवाहन बँक अधिकाऱ्यांनी केलंय. बँकेतील अनेक कॅशिअरही याच पद्धतीचा अवलंब करतायेत. त्यामुळे कोरोनाच्या भितीनं तुम्ही जर नोटांवर सॅनिटायझरचा स्प्रे फवारत असाल तर जरा थांबा. त्यामुळे नोटा खराब होऊ शकतात. नोटांपेक्षा हाताला सॅनिटायझर लावा. हीच पद्धत योग्य आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live