उत्तर भारतीयांनी ठरवले तर, मुंबई बंद पडू शकते- निरुपम

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

मुंबई- उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्र ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम असे बोलले आहेत, यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून घरकाम करण्यापर्यंत सर्व कामे ही मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर भारतीय माणूसच करतो. त्यांनी काम नाही केले तर, कोण करणार? त्यांच्या जीवावरच मुंबई चालू आहे असे निरुपम यांनी सांगितले आहे.

निरुपम पुढे म्हणाले की, तुम्ही कुठलेही क्षेत्र सांगा, त्यामध्ये उत्तर भारतीय आहेत. उत्तर भारतीय माणूस कुठलेही काम करु शकतो. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. जर एक दिवस सगळ्या उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना खायला मिळणार नाही. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

संजय निरुपमांची थेट पंतप्रधानांना धमकी.. काय म्हणाले निरुपम पाहा व्हिडीओ
LINK  : https://youtu.be/DeMBuaq74gc

संबंधित बातम्या

Saam TV Live