भावाला डावलल्यानं संजय राऊतांची मंत्रिमंडळ विस्तरात दांडी, तर सुनील राऊत देणार राजीनामा?

सरकारनामा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मुंबई : मंत्रीमंडळाच्या विस्ताराची वेळ जवळ येत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. शिवसेनेतही काहीजण नाराज असून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे देखिल मंत्रीमंडळात समावेश न झाल्याबद्दल नाराज आहेत. यावरुन संजय राऊतही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राऊतांनी दांडी मारलीय. यावरुनच राजकीय चर्चेला उधाण आलंय.

सुनील राऊत मुंबईच्या विक्रोळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ विस्तारात ग्रामीण भागाला जास्ती स्थान दिले आहे. त्यामुळे राऊत यांची संधी डावलली गेली आहे. राऊत त्यामुळे नाराज असून ते मुंबईबाहेर गेल्याचे वृत्त आहे. सुनील राऊत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, आपण मंत्रीमंडळ विस्तारावरून नाराज नसल्याचा दावा राऊत यांचे बंधू खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

दुसरीकडे वाईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने वाई मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले असून  लोणंद ,वाई,महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण मित्रपक्षाना दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एकीकडे करीत असतानाच दुसरीकडे मला अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचे साधे निमंत्रणही मिळाले नाही अशी नाराजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे देखिल मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने नाराज आहेत.

Web Title - Sanjay Raut absent in cabinet expansion...

संबंधित बातम्या

Saam TV Live