दिवे लावण्याच्या उपक्रमावरुन संजय राऊतांची मोदींवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 एप्रिल 2020

साहेब, पोटापाण्याचं बघा! असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय. 

५ एप्रिल रविवारी मोदींनी देशातील सर्वांना दिवे लावण्याचं आवाहन केलंय. त्यावरुन आता सर्वत्र स्तरातून टीका करायला सुरुवात झालीय. विरोधकांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधलाय. मोदींनी घरातील सर्व लाईट्स बंद करुन दिवे लावण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. ५) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर राऊत यांनी मोदी यांच्या या आवाहनावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मोदींनी लोकांना जेव्हा टाळ्या वाजवायला सांगितले, तेव्हा लोकांनी रस्त्यावर जमा होऊन ढोल वाजवले. आता त्यांनी स्वतःच्या घरालाच आग लावली नाही म्हणजे झाले. साहेब कामाचे आणि लोकांच्या पोटापाण्याचे बोला.” मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसनेही निशाण साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, 'कोरोना विषाणूने थैमान घातले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे ‘इव्हेंट’ करून परिस्थितीचे गांभीर्य घालवत आहेत.’

काँग्रेसने आपल्या या ट्विटमध्ये एक हॅशटॅग वापरत मोदींनी देशापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

WEb Title - Marathi news Sanjay Raut crticism on pm modi


संबंधित बातम्या

Saam TV Live