राज्यमंत्र्यांना धक्काबुक्की प्रकरणी राऊत आज बेळगावात देणार उत्तर...

सरकारनामा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मुंबई  : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज बेळगावात दाखल होत आहेत, त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र असा नवा वाद उभा राहणार आहे.

मुंबई  : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज बेळगावात दाखल होत आहेत, त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र असा नवा वाद उभा राहणार आहे.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा महाविकास आघाडीने निषेध केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पक्ष या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला गेलेले पाटील-यड्रावकर यांना आज कर्नाटक पोलिसांनी अटक केली. अटकेवरून पाटील आणि कर्नाटक पोलीस यांच्यात वादावादी झाली. तत्पूर्वी पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली.

या घटनेबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र प्रितिक्रीया दिली आहे. हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यापासून रोखण्याचा भाजप साधा निषेध तरी करेल काय? मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू या काय घडतंय जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करीत असताना बेळगावला महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. मराठी बांधवांवर सुरू असलेल्या या दडपशाहीचा जाहीर निषेध, अशी प्रितिक्रीया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर दिली आहे.

Web Title -  Sanjay Raut going to belgaon and give answer who missbehaves with ministers 


संबंधित बातम्या

Saam TV Live