उदयनराजेंनीही छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत - संजय राऊतांची मागणी

सरकारनामा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

शिवाजी महाराजांची जेम्म लेनने बदनामी केली तेव्हा शिवसेना कुठे होती ? उदयनराजेंचा सवाल https://t.co/rCXDYIirs2

— MySarkarnama (@MySarkarnama) January 14, 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केल्यावरून वाद पेटला होता. भाजपने केलेल्या या प्रकारावर आता छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे आणि खुर्च्या सोडाव्यात, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी पवारांच्या दारातील कुत्रा, अशा शब्दांत राऊतांचे नाव न घेता संभावना केली होती. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासाठी छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का, असाही सवाल उदयनराजे यांनी विचारला होता. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राऊत यांचे तोंड आवरायला सांगा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मिडियातून मांडली होती. 

जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच : उदयनराजे https://t.co/MhJ4chM6xL

— MySarkarnama (@MySarkarnama) January 14, 2020

शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिवसेना हे नाव वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता राऊत म्हणाले की उदयनराजे यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान आहेत. आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा परवानगी घेत नाही, असा युक्तिवाद केला. शरद पवार हे जाणते राजे असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. 

Web Title -  Sanjay raut says udayanraje should buy a proof of  Descendants Of shivaji maharaj 

संबंधित बातम्या

Saam TV Live