राऊतांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे असे पडसाद...

राऊतांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे असे पडसाद...

काँग्रेस आणि शिवसेनेत सध्या जंपली आहे. कारण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय की, इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटल्या. होत्या वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतलीय. त्यांनी म्हटलंय की, "इंदिरा गांधी जर, गँगस्टरला भेटकत होत्या तर त्या आधारावर काँग्रेस जिंकत होती का?" असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. राऊतांच्या मुलाखतीचा दाखला देत त्यांनी हा प्रश्न विचारलाय. आणि काँग्रेसनं याचं स्पष्टीकरण द्यावं अशीही मागणी फडणवीसांनी केलीय.

 दरम्यान यावरुन काँग्रेसमध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. यासह संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य तात्काळ मागे घ्यावं अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती, त्यावरुन राऊतांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलंय. काँग्रसमध्ये या राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर आक्रमक पद्धतीने पडसाद उमटलेले पहायला मिळाले. त्यानुसारच तात्काळ संजय राऊतांनी हे त्यांचं इदिरा गांधींबद्दलचं वक्तव्य 

काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रीया

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची बदनामी करणाऱ्यांना आम्ही जाब विचारूच. बरं होईल की, शिवसेनेच्या मिस्टर शायरने दुसऱ्यांची हल्की-फुल्की शायरी ऐकवून महाराष्ट्राचं मनोरंजन करावं, असा टोला देखील त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना ट्विटरवरुन लगावण्यात आलाय. तसंच काँग्रेस नेते मिलिंद देवरांनीही इंदिरा गांधींबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी केलीय. इंदिराजी खर्‍या देशभक्त होत्या ज्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत कधीही तडजोड केली नाही, असं ट्विट देवरांनी केलं होतं. 

Web Title -  Sanjay raut statement Effect about idira gandi...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com