भावाला मंत्रिपद न मिळाल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मुंबई : महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात राज्याला चांगली दिशा मिळेल. महाराष्ट्राने अनेक दिवस ज्या चांगल्या सरकराची वाट बघितली होती, ते सरकार आता आले आहे, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. आज ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 

मुंबई : महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात राज्याला चांगली दिशा मिळेल. महाराष्ट्राने अनेक दिवस ज्या चांगल्या सरकराची वाट बघितली होती, ते सरकार आता आले आहे, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. आज ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 

भाजपने आज होणाऱ्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकणे अयोग्य आहे. चहापानावर बहिष्कार टाकण्यापर्यंत ठीक आहे, मात्र शपथविधीवर बहिष्कार टाकणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे व संविधानाला धरून नाही, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. 

खातेवाटप हा काही गंभीर प्रश्न नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्रित निर्णय घेतले आहेत. खातेवाटपाबाबत सर्व नावे ठरली आहेत. त्यात काहीही बदल होणार नाही, असे त्यांनी सांगितले. राऊतांचा भाऊ सुनिल राऊत यांना मंत्रिपद दिले नसल्याने पक्षावर नाराज आहात का, असे विचारले असता पक्षावर बिलकूल नाराज नाही. जे ठरले आहे तसेच होईल असे राऊतांनी सांगितले. 

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने आपल्या 13 मंत्र्यांची अंतिम यादी निश्चित केली आहे. यामध्ये शिवसेनेने आठ नव्या चेहऱ्यांना संधी देताना, दर दोन वर्षांनी मंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातून कोणीतरी निवडणूक लढले होते. अंधेरी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी आपला ठसा उमटविण्यास सुरवात केली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांच्याकडे नगरविकास या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई महापालिकेत आपला दबदबा कायम राखण्यासाठी शिवसेनेला हे खाते स्वतःकडेच ठेवावे लागणार आहे. ऐनवेळी तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रिपदावरून नाव वगळण्यात आले आहे.

Web Title: Sanjay Raut speaks about cabinate expansion


संबंधित बातम्या

Saam TV Live