'विखेंची टुरटुर!'वरुन राऊत-विखे सामना, वाचा काय आहे वाद?

साम टीव्ही
मंगळवार, 23 जून 2020

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात केलेल्या टीकेला भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय. आमची बांधिलकी सिल्व्हर ओक ते मातोश्री अस्वस्थ येरझारा घालत नाही असा टोला विखे यांनी संजय राऊतांना हाणलाय. विखे पाटील यांनी आपल्या उत्तराचं पत्र ट्विट केलंय.  मुखपत्राचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा, असं कॅप्शन त्यांनी या ट्विटला दिलंय. दरम्यान संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या मुखपत्रातून, "थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!"

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात केलेल्या टीकेला भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय. आमची बांधिलकी सिल्व्हर ओक ते मातोश्री अस्वस्थ येरझारा घालत नाही असा टोला विखे यांनी संजय राऊतांना हाणलाय. विखे पाटील यांनी आपल्या उत्तराचं पत्र ट्विट केलंय.  मुखपत्राचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा, असं कॅप्शन त्यांनी या ट्विटला दिलंय. दरम्यान संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या मुखपत्रातून, "थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!" या मथळ्याखाली अग्रलेख छापण्यात आला होता. "फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे," अशा शब्दात टिका करण्यात आली होती...
त्यावर विखेनी पत्र लिहून उत्तर दिलंय.

काय उत्तर दिलंय विखेंनी?

 

तेव्हा कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे व कशी चाचपणी करीत होते, हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती, तर आपण `थोरातांची कमळा` असा केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता,`` असे सांगून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पाठविलेल्या पत्रात मोठी भांडाफोड केली आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सध्या `महाभारत` रंगले आहे. शिवसेनेने टाकलेल्या एका `बाॅंम्ब`मुळे या युद्धाची ठिकणी पडली. थोरात विरुद्ध विखे यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना अधूनमधून धनुष्यबाणही `अस्त्रांचा`वापर करीत आहे. त्यामुळे ते अधिकच भडकत आहे. यापूर्वी शिवसेनेने एका अग्रलेखातून काॅंग्रेसवर टीका होती. त्याला थोरात यांनी साैम्य शब्दांत उत्तर देत हे प्रकरण मिटवून घेण्याची भूमिका घेतली होती. त्या वेळी विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका करून `सत्तेसाठी लाचार` असा उल्लेख केला. त्यामुळे थोरात यांनीही विखे पाटील यांच्यावर टीकात्मक अस्त्रांचा वापर केल्याने हे युद्ध भडकले.    

दरम्यान, शिवसेनेने पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखातून विखे पाटील यांच्यावर जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे आज विखे पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र पाठवून विधानसभेपूर्वी पडद्यामागे घडलेल्या काही गोष्टींची भांडाफोड केली. शिवसेनेच्या मुखपत्राच्या अग्रलेखात `थोरातांची कमळा` असा उल्लेख होता. त्याचा संदर्भ देत विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय घडले होते, याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून मोठा गाैप्यस्फोट केला आहे.

विखे पाटील यांनी राऊत यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे,  ``मी भाजपमध्ये आनंदी आहे, पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्री देखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल, तर त्यात माझा काय दोष? `थोरातांची कमळा` असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती, हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती, तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले, हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावा!`` असे सांगून भाजपमध्ये जाण्यासाठी कोणी व कसे प्रयत्न केले, हे अप्रत्यक्ष सांगूनच टाकले आहे. विधानसभेपूर्वी पडद्यामागे काय काय घडले, आणि हे सांगितले, तर पुढे काय होईल, याबाबत विखे पाटील यांनी संकेत दिले आहेत.``


संबंधित बातम्या

Saam TV Live