पतंगबाजीला काहीसा ब्रेक? पतंग दुकानदारांवर यंदा ‘संक्रांत’ ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

औरंगाबाद - मकरसंक्रांत जसजशी जवळ येते तसा पतंगबाजीचा ‘फिव्हर’ सर्वत्र दिसू लागतो. यंदा मात्र पतंगबाजीला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. पतंगांचा खप निम्म्याने घसरल्याचे शहरातील पतंग दुकानदार सांगत आहेत.

मकर संक्रांतीसाठी तयार करण्यात आलेले पतंग आणि अन्य सामग्री अपेक्षेप्रमाणे विकलीच गेली नसल्याने दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा लागली आहे. संक्रांत अवघ्या आठवड्यावर आलेली असतानाही थंडावलेली विक्री दुकानदारांना चिंतेत टाकणारी ठरली आहे. 

याला दुष्काळाचाही फटका बसला आहे. ग्रामीण भागात जाणारा माल यंदा खूप कमी झाला असून, शहरातील ग्राहकांवर दुकानदारांची मदार कायम आहे. ग्रामीण भागात खपणाऱ्या पतंगांची मागणी खूप कमी झाली आहे. 

पक्षी आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरलेल्या नायलॉनचा मांजा यंदा बाजारातून गायब आहे. दुकानदारांना पोलिसांनी दोन महिने अगोदरच नोटिसा बजावल्याने हा मांजा आता दुकानांतून गायब झाला आहे.

भाव स्थिर; मागणी घटली
यंदा पतंगांच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही पण ग्राहकांमध्ये मागणीसुद्धा नसल्याने दुकानात माल पडून आहे. बरेलीहून येणारा मांजा आणि धागासुद्धा यावेळी कमी मागवून दुकानदारांनी अधिकची गुंतवणूक करणे टाळले आहे.

दुष्काळाचा परिणाम संक्रांतीवर दिसून येत आहे. आठ दिवसांवर संक्रांत आलेली असताना ग्राहकांकडून उत्साहवर्धक मागणी अद्याप झालेली नाही.
- राजा भावसेवाल, पतंग व्यापारी, राजाबाजार.

संबंधित बातम्या

Saam TV Live