#MeToo सपना भावनांनी यांचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

#MeToo च्या यादीत आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत.

 

#MeToo च्या यादीत आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत.

 

"मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची गरज आहे."  ज्यामुळे तुमचा महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे.

तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल असेही सपना भवनानी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सपना यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार अमिताभ बच्चन यांच्याकडून झाले नसल्याचही त्यांनी सपष्ट केलंय. 

 

 

WebTitle : marathi news sapana bhavnani me too india amitabh bachchan sexual abuse controversy 


संबंधित बातम्या

Saam TV Live