जगात भारी सरपंच थाळी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

पुण्याच्या बाणेर लिंक रस्त्यावरचा एक ढाबा त्याच्या नावामुळं तुमचं लक्ष वेधून घेतो. या ढाब्याचं नाव आहे तात्याचा ढाबा... हे नाव जेवढं वेगळं आहे तेवढीच तिथली थाळीही वेगळी आहे.  इथं मिळणारी थाळी एक वेटर घेऊन येत नाही. इथली थाळी घेऊन येण्यासाठी दोन दोन वेटर लागतात.

नॉनवेजमधील आठ ते दहा प्रकार तुम्हाला एकाच थाळीत मिळतात. मटण, चिकण, फिश, सुकी कलेजी, किमा, काळां  रस्सा, थांबडा  रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक  तुपातील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, चार प्रकारच्या  भाकरी, ताक, सोल कडी आणि कोशिंबीर असा  भल्ला मोठा मेनू एकाच वेळी एकाच थाळीत मिळतो.

सरपंच थाळी ही जगातील सर्वात मोठी नॉन व्हेज  थाळी असल्याचा दावा ढाबा मालकानं केलाय.
 ही थाळी पाहिल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग जाऊया तात्याच्या ढाब्यावर.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live