साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे. 2015 मध्ये हा खटला दाखल झाला होता. सद्या सहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आवटी यांच्या समोर हा खटला सुरु आहे. त्यात तो हजर राहत नसल्याने न्यायाधीश आवटी यांनी याप्रकरणी अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तिघांचे पथक काल रात्री मुंबईला रवाना झाले होते. आज दुपारी त्यांनी बिचुकलेला बिग बॉसच्या घरातुन ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणले जात आहे. उद्या सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

Web Title: Bigg Boss candidate Abhijit Bichukale arrested by police from Bigg Boss house
 
संबंधित बातम्या

Saam TV Live