शिवछत्रपती घराण्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही ; सातारा बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भाेसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याचा  निषेध व्यक्त करण्यासाठी सातारकरांनी आज (गुरुवार) सातारा बंद ठेवला आहे. 
या बंदमध्ये सातारा शहारातील व्यापारी, हाॅकर्स आदी संघटना सहभागी झाल्या आहेत. 

शहरातील राजवाडा, माेती चाैक, पाेवई नाका, बसस्थानाक येथील बहुतांश व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. सकाळपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. बस तसेच रिक्षा वाहतुक सुरळीत सुरु आहे. पाेवई नाका, माेती चाैक येथे पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने आज (गुरुवार) सातारा शहरात खासदार संजय राऊत यांचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. भाजपने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि गलिच्छ वक्तव्य केल्याबद्दल संजय राऊत यांचा सकाळी साडेदहा वाजता मोती चौकात जिल्हा व शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे असे नमूद करण्यात आले आहे.

Web Title satara city closed protest against sanjay raut statement

संबंधित बातम्या

Saam TV Live