सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल याची मला चिंता नाही - शरद पवार

सातारा : यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणूकीत निवडणूक आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले. 

वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी शरद पवार काल रात्री साताऱ्यात आले होते. आज सकाळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. 

पवार म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्या तीनही आमदारांनी मतदार संघातील कामे होत नसल्यामुळे भाजपत जात असल्याचे सांगितले. याचा अर्थ असा की, सत्तेत असणारे लोक लोकप्रतिनिधींच्या रास्त कामांकडे लक्ष देत नाहीत, किंवा त्यांच्याशी सूडबुद्धीने वागतात असा निष्कर्ष निघतो. शासकीय यंत्रणेचा यापूर्वी इतका गैर वापर केला जात नव्हता. अगदी मनोहर जोशी व नारायण राणे मुख्यमंत्री असतानाही ते झाले नाही. तरीही जास्त लोक त्यांना मिळालेले नाहीत. कामे होत नाहीत ही वस्तूस्थिती असली तरी, जिल्ह्यातील अन्य सर्व लोक आमच्या सोबत आहे. त्यांची नाळ मतदारांशी चांगली आहे. त्यामुळे त्यांना अडचण येत नाही. 1980 मध्येही यापेक्षा जास्त संख्येने आमदार पक्ष सोडून गेले होते. 58 आमदारांपैकी 52 लोक सोडून गेले होते. आम्ही केवळ सहाजणच राहिलो होतो. परंतु, जे सोडून गेले त्यातील एकही जण नंतर झालेल्या निवडणूकीत निवडूण आला नाही. आमच्या सर्व जागा पुन्हा भरल्या. त्याच प्रमाणे सातारा मतदार संघही राष्ट्रवादीकडे राहिल. या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा हे लवरच ठरवू असेही ते म्हणाले. 

रामराजे व उदयनराजेंमधील माझ्या उपस्थितीतच माझ्या घरी मिटविण्यात आला होता. त्या दोघांनी गळाभेट घेतल्याचे मी पाहिले आहे. मला कार्यकर्ते सांगतात की काही लोक रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन करतात. आता काही वाद असेल तर, पहावा लागेल असेही एका प्रश्‍नाच्या उत्तरावर बोलताना ते म्हणाले. उदयनराजेंवर कोणती जबाबदारी देणार यावर ते म्हणाले, माझी परवा त्यांच्याशी भेट होणार आहे. त्या वेळी पुढील ठरवू. 

तीन अर्ज कोणाचे 
सातारा मतदार संघात कोण या प्रश्‍नावर बोलताना पवार म्हणाले, लवकरच ठरवू आत्ताच माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. त्यामुळे ते तीन अर्ज कोणाचे याची उत्सुकता सर्वच उपस्थितांना लागली होती. त्यावर जास्त बोलणे पवारांनी टाळले. 

मेगा भरती हवेत 
मराठा मोर्चाच्या वेळी लाखो लोकांची मेगा भरती करणार असल्याचे राज्यकर्त्यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले. मेगा नोकर भरतीची घोषणा हवेतच गेली. त्याचप्रमाणे पक्षांतराची मेगा भरतीचेही होईल असे पवार म्हणाले. 

Web Title: NCP chief Sharad Pawar talked about Satara assembly seat

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com