जनता दरबारात उदयनराजे रमले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये...

सरकारनामा
रविवार, 19 जानेवारी 2020

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भरगच्च कामाच्या व्यापातून वेळ काढून जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आज त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी जनता दरबार घेतला. या मध्ये त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनींशी संवाद साधला. 

उदयनराजे भोसले हे महिन्यात एक दिवस जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी जनता दरबार घेऊन नागरकांचे प्रश्‍न, समस्या जाणून घेऊन त्या सोडवितात. खासदार असताना त्यांचा हा पायंडा कायम ठेवला मात्र, आता खासदार नसतानाही त्यांनी जनता दरबाराचा पायंडा कायम ठेवला आहे. आज त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थींनींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न जाणून घेऊन त्यावर उपाय योजना काय करता येतील, या विषयी चर्चा केली. त्यानंतर उदयनराजेंसोबत सर्वांनी सेल्फी काढली. तसेच जनता दरबारातील उपस्थित नागरिक व महिलांच्या समस्यां त्यांनी जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यावर भर दिला. 

Web Title satara student selfie with udayanraje bhosle

संबंधित बातम्या

Saam TV Live