सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागा दुपटीने वाढण्याची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

किती जागांवर किती भाव
भाजप
230 जागा - 23 पैसे
235 जागा - 42 पैसे
240 जागा - एक रुपया
245 जागा - एक रुपया 40 पैसे

कॉंग्रेस
90 जागा - 28 पैसे
95 जागा - 67 पैसे
100 जागा - एक रुपया
105 जागा - एक रुपया 60 पैसे

मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा होरा आहे. देशात भाजप व त्यांचे मित्रपक्ष मिळून 230 जागांचा पल्ला गाठेल, तर कॉंग्रेसच्या जागाही दुपटीने वाढून शंभरी गाठेल, अशी शक्‍यताही सट्टेबाजांनी व्यक्त केली आहे. या निकालावर 30 हजार कोटींहून अधिक रुपयांचा सट्टा लागल्याचे जाणकारांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीतही सट्टा बाजार तेजीत आहे. भाजपसह विविध पक्षांवर कोट्यवधींचा सट्टा लावण्यात आला आहे. सद्यस्थितीत सट्टा बाजारात भाजपला पसंती मिळत असली, तरी मतदानाच्या टप्प्यांगणिक त्यांचे उमेदवार फारच कमी मतांनी निवडून येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपला मुंबईत सहापैकी पाच जागांवर विजय मिळेल. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यात कडवी झुंज आहे. येथे काही हजार मतांच्या फरकाने उमेदवार निवडून येईल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. 

उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टीवर सट्टेबाजारात 27 पैशांचा सट्टा लावण्यात आला आहे. इथे कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर तीन रुपये भाव लावण्यात आला आहे. गजानन कीर्तिकर 65 पैसे, संजय निरुपम एक रुपया 10 पैसे, राहुल शेवाळे 45 पैसे, एकनाथ गायकवाड एक रुपया 60 पैसे, संजय दिना पाटील एक रुपया 17 पैसे, मनोज कोटक 70 पैसे, पूनम महाजन 55 पैसे, प्रिया दत्त एक रुपया, अरविंद सावंत 54 पैसे, तर मिलिंद देवरा यांच्यासाठी 52 पैसे भाव असल्याचे सांगण्यात आले. 

देशात भाजपला 230 ते 240 जागा मिळतील आणि कॉंग्रेसच्या जागा दुपटीने वाढून 90 ते 100 पर्यंत पोहचतील, अशी शक्‍यता सट्टेबाजांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात युतीला 48 पैकी 27 ते 31 जागा, तर आघाडीला 17 ते 21 जागा मिळण्याचा अंदाजही सट्टेबाजांनी वर्तवला. 

किती जागांवर किती भाव
भाजप

230 जागा - 23 पैसे
235 जागा - 42 पैसे
240 जागा - एक रुपया
245 जागा - एक रुपया 40 पैसे

कॉंग्रेस
90 जागा - 28 पैसे
95 जागा - 67 पैसे
100 जागा - एक रुपया
105 जागा - एक रुपया 60 पैसे

Web Title: marathi news satta bazar speculation of Loksabha Election 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live