...म्हणून त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजबाहेर सत्यनारायण पूजा घातली 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेच्या वादानंतर पतित पावन संघटनेच्यावतीने आज (ता.28) महाविद्यालयाच्या बाहेर सत्यनारायण पूजा केली.  

 "सत्यनारायण पूजेला विरोध होतोय हे आम्हाला सहन झाले नाही, म्हणून आम्ही गेटच्या बाहेर सत्यनारायण पूजा केली. ज्यांनी विरोध केला तो मुद्दाम केला.'', असे मत पतित पावन संघटनेचे श्रेयस देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. ''हिंदू की रक्षा कोन करेगा, पतीत पावन करेगा'' अशा घोषणा दिल्या जात आहेत.

पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार गुरुवारी(ता.23) घडला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले होते. शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा पद्धतीची पूजा घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत काही संघटनांनी याला विरोध केला. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर पतित पावन संघटनेच्यावतीने महाविद्यालयाच्या बाहेर सत्यनारायण पूजा करुन निषेध व्यक्त केला जात आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live