(VIDEO) 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताचा गोल्डन नेम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत देशाच्या खात्यात ५ पदकं टाकली आहेत. पहिल्या दिवशी अपुर्वी चंदेला-रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. 

WebTitle : saurabh chaudhari bags gold medal in asian games 2018 10m airpistol

संबंधित बातम्या

Saam TV Live