सौराष्ट एक्स्प्रेसमधून मुंबईत आलं ८० हजार लीटर दूध

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

'गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला. सोमवारी सौराष्ट एक्स्प्रेसला जोडलेल्या दोन टँकरमधून ८० हजार लीटर दूध मुंबईकडे रवाना झाले. याच वेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे तारापूरमध्ये आंदोलन करीत होते. 

सोमवारी ही गाडी बोईसर येथे आल्यावर बोईसर, पालघर, सफाळे आदी रेल्वे स्थानकांवर आंदोलक आंदोलन करतील, या शक्यतेमुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे ४ वाजून ५५ मिनिटांनी एक्स्प्रेस पालघर येथे आल्यानंतर कुठलेही आंदोलन झाले नाही. या गाडीला जोडलेले ४० हजार लीटर्स क्षमतेचे २ टँकर मुंबईकडे आले आहेत.

WebTitle : marathi news saurashtra express eighty thousand litres milk sent to mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live