सावरकरांचा ‘वीर’ हा उल्लेख पाठ्यपुस्तकातून हटवला..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

जयपूरः राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात बदल करताना विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील 'वीर' हा उल्लेख टाळला आहे. राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला आहे.

जयपूरः राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात बदल करताना विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील 'वीर' हा उल्लेख टाळला आहे. राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला आहे.

अशोक गेहलोत सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करताना सावरकरांच्या नावाआधी येणारा 'वीर' हा उल्लेख टाळला आहे. नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकांमधील बदलांसंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने 13 फेब्रुवारीपासून दिलेल्या सूचनांच्या आधारे हे बदल केले आहेत. आधी असलेल्या पुस्तकांमध्ये काय काय बदल केले गेले पाहिजेत हे या समितीने सुचवले आहे. आधीच्या पुस्तकांमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या चळवळीचा उल्लेख होता त्या ठिकाणी सावरकरांच्या नावापुढे 'वीर' ही उपाधी देण्यात आलेली होती. मात्र आता नव्याने छापलेल्या पुस्तकांमध्ये हा उल्लेख नाही.

जुन्या पुस्तकामध्ये वीर सावरकर असे त्यांच्या नावपुढे लिहिण्यात आले होते. सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात काय आणि कसे योगदान दिले हे या मजकुरात देण्यात आले होते. मात्र, नव्या पुस्तकामध्ये
स्वातंत्र्य चळवळीतले नेते या मजकुरात विनायक दामोदर सावरकर असे छापले आहे. त्यांच्या नावपुढची 'वीर' ही उपाधी हटवण्यात आली आहे. सेल्युलर जेलमध्ये सावरकारांचा छळ करण्यात आला असा उल्लेख नव्या मजकुरात आहे. एवढंच नाहीतर सावरकरांनी स्वतःला सन ऑफ पोर्तुगाल म्हटल्याचा उल्लेख या माहितीत केला गेला आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना सावरकरांनी पुढे आणली. भारत छोडो या चळवळीला सावरकरांनी विरोध केला असे यात म्हटले गेले आहे. पाकिस्तानच्या निर्मितीला सावरकरांचा विरोध होता असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Savarkar loses Veer as Congress govt rewrites school textbooks in Rajasthan


संबंधित बातम्या

Saam TV Live