स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक म्हणून ओळख असलेल्या एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाची देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड म्हणून निवड झालीय. टाटा मोटर्स, पतंजली, रिलायन्स जियो आणि बीएसएनएलला मागे टाकत एसबीआयने हे पहिलं स्थान पटकावलंय.

युकेतील युगव या ऑनलाइन मार्केट रिसर्च ऍण्ड डाटा ऍनालटिक्स कंपनीनं हा सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये एकूण 152 ब्रॅण्ड सहभागी झाले होते. 2 ते 8 ऑगस्टदरम्यान झालेल्या या सर्व्हेमध्ये एकूण 1 हजार 193 लोकांनी भाग घेतला होता. यातील 47 टक्के लोकांनी एसबीआयला पसंती दिलीय.

तर, पदार्थांमध्ये अमूल हा ब्रॅण्ड नंबर एक आहे. तर रामदेव बाबांच्या पतंजलीने दुसरे स्थान मिळविले आहे. सौंदर्याची काळजी घेणारा ब्रॅण्ड म्हणून पतंजली सर्वात पुढे आहे. पतंजलीने डाबर आणि विकोला मागे टाकले आहे. तर टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएलला 41 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

WebTitle : marathi news SBI biggest patriotic brand in india

संबंधित बातम्या

Saam TV Live