लवकरच एसबीआयचं डेबिट कार्ड रदद्; कसे काढायचे पैसे, कशी करणार खरेदी ?

तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

लवकरच SBI आपडे डेबिड कार्ड्स कायमचे बंद करणारे. फक्त एसबीआयच नाही इतर बँकासुद्धा हळूहळू आपले डेबिट कार्ड्स बंद करण्याच्या मार्गावर आहेत. पण कार्ड नसतील तर एटीएममधून पैसे कसे काढायचे ? खरेदी कशी करायची ? पुन्हा बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करायची असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर असं काहीही होणार नाहीय.

देशाची वाटचाल कार्डमुक्त करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आलाय. एसबीआय डिजिटल प्रणाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.  सगळ्यात आधी स्टेट बँकेनं यावर पर्याय दिलाय. आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या पर्यायाचा वापर करताय. एसबीआयनं 'योनो' प्लॅटफॉर्म लाँच केलाय. योनोमुळे देश कार्ड मुक्तीकडे वाटचाल करेल असा एसबीआयला विश्वास आहे. 

भारतात सध्या 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडीट कार्ड आहेत. डिजिटल इंडियासाठी कार्ड बंद करण्याची योजना असली तरी झटकन नोटाबंदी सारखी कार्डबंदी होऊ नये असा सूर सर्वसामान्यांमधून उमटतोय. 

WebTitle : marathi news SBI soon to remove manual use of debit card 

संबंधित बातम्या

Saam TV Live