राज्यभरात रक्ताचा तुटवडा; राज्याला ५० हजार युनिट रक्ताची गरज 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई - उन्हाळी सुटीची सुरुवात झाल्यानंतर राज्यभरात रक्ताचा तुटवडा सुरू झाला आहे. राज्यात रक्ताचा ५० हजार युनिटस्‌; तर मुंबईत आठ ते १० हजार युनिटस्‌ इतका तुटवडा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि रक्तपेढ्यांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. चित्रपटगृहांतही रक्तदानाचे आवाहन करणाऱ्या जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

रक्तदान शिबिरे घेण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. आता उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. राज्यात दर महिन्यात रक्ताची दीड लाख युनिटस्‌ राखीव ठेवलेली असतात. परंतु, मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात फक्त एक लाख युनिट रक्तसाठा आहे. मुंबईत २५ हजार युनिट रक्त राखून ठेवलेले असते. हे प्रमाण सध्या १५ हजार युनिट एवढेच आहे.

तुटवडा असल्यामुळे राखीव साठ्यातील रक्त प्रामुख्याने अपघातग्रस्तांसाठी वापरले जात आहे. रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील आणि तातडीने शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना एक युनिट रक्त दिल्यासही, त्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांना रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. 

Web Title : marathi news scarcity of blood maharashtra needs fifty thousand units of blood

संबंधित बातम्या

Saam TV Live