उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये  स्कूल बस आणि ट्रेनमध्ये धडक; 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये एका स्कूल बस आणि ट्रेनमध्ये झालेल्या धडकेत 13 विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गंभीर जखमी झाले. स्कूल बस रेल्वे लाईन क्रॉस करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार ही बस डिव्हाईन पब्लिक स्कूलची होती. विष्णूपुरा येथील दुदही रेल्वे क्रॉसिंगवर हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर 7 जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रेल्वे अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये एका स्कूल बस आणि ट्रेनमध्ये झालेल्या धडकेत 13 विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गंभीर जखमी झाले. स्कूल बस रेल्वे लाईन क्रॉस करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार ही बस डिव्हाईन पब्लिक स्कूलची होती. विष्णूपुरा येथील दुदही रेल्वे क्रॉसिंगवर हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर 7 जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रेल्वे अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. अपघातावेळी स्कूलबसमध्ये 20 विद्यार्थी होते.. 


संबंधित बातम्या

Saam TV Live