मुला-मुलींच्या शाळा प्रवेशासाठी आता लाखोंचं कर्ज काढावं लागणार?

सागर आव्हाडसह अमोल कविटकर
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर, तुम्हाला वेळप्रसंगी कर्जही काढावं लागेल. असं आम्ही तुम्हाला का सांगतोय? हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहा.

तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर, तुम्हाला वेळप्रसंगी कर्जही काढावं लागेल. असं आम्ही तुम्हाला का सांगतोय? हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहा.

तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला वेळप्रसंगी कर्जही काढावे लागेल. कारण मुंबईसह राज्यातील काही शाळांमध्ये प्रवेशासाठी लूट सुरु झालीय. शाळा प्रवेश घेताना डोनेशन घेणे हे बेकायदा आहे. यातून पळवाट म्हणून अनेक नामांकित शाळांनी अनामत रकमेच्या नावाखाली पालकांची लूट सुरू केलीय. 25 लाख रुपयांपर्यंत शाळांकडून मागणी केली जातेय.

अनामत रक्कम विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा विभाग आदींमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यासाठी घेतली जात असल्याचे शाळांकडून पालकांना सांगण्यात येतंय. ही रक्कम पालकांना पाल्य शाळा सोडेल तेव्हा बिनव्याजी दिली जाईल, असं पालकांना सांगण्यात येतंय.

पालकांकडून शैक्षणिक साहित्य-सुविधांच्या नावाखाली उकळली जाणारी रक्कम लाखोंच्या घरात आहे. पण केवळ प्रवेशासाठी इतका पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत पालक आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारनं या प्रकरणात लक्ष घालावं आणि पालक-हिताच्या बाजूनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पालक करतायंत.

Web Title -  school fees rates are very high...


संबंधित बातम्या

Saam TV Live