ताडपत्रीच्या तंबूत भरते शाळा; उन्हाळा-पावसाळा कसा काढत असतील ही मुले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

शिक्षणविभाग शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमच्या गप्पा मारत असताना तिकडं गोंदिया जिल्ह्यातल्या परसटोला शाळेचे वर्ग चक्क तंबूत भरतात.

शाळेच्या इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहे. शिक्षकांनी शिक्षण विभागाकडं तक्रार केली पण त्याकडं कुणीच लक्ष दिलं नाही. शेवटी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी ताडपत्रीचे तंबू टाकलेत. या तंबूत दोन वर्गातील जवळपास साठ विद्यार्थी शिक्षण घेतायत.

झेडपीच्या शाळांवर सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण हा सगळा पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. परसटोलातील तंबूची शाळा याचं मूर्तीमंत उदाहरण आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live