SCO शिखर संमेलनासाठी मोदी पाकिस्तानमार्गे जाणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे.

13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) कडून शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जूनला मोदी बिश्केकला रवाना होतील. परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधानांचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशाच्या हवाई क्षेत्रातून किर्गिस्तानच्या बिश्केक येथे जाईल. सुरवातीला मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जातील, असा विचार होता. पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सुद्धा शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार आहेत. मात्र, मोदी व इम्रान खान यांची एससीओच्या बैठकीत भेट होणार नाही.'

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भारताने पाकिस्ताच्या बालकोट येथे हवाई हल्ला केला होता. तेंव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील 2 मार्ग खुले केले आहेत. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागले आहेत.

WebTitle :marathi news SCO summit narendra modi will not use air space of pakistan 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live