दहशतवादाला समर्थन देणारे आणि फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवाः नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

बिश्केक:  दहशतवादाला समर्थन देणारे आणि फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना केली.

बिश्केक:  दहशतवादाला समर्थन देणारे आणि फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना केली.

मोदी म्हणाले, 'भारत गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरुपी एससीओ सदस्य आहे. एससीओच्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सकारात्मकपणे सहभाग घेतला असून, योगदान दिले आहे. एससीओची भुमिका आणि विश्वासार्हता वाढावी याकरिता आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगदान देत आहोत. दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता दहशतवादाला समर्थन देणाऱ्या तसेच फंडिंग करणाऱ्या देशांना जबाबदार ठरवले गेले पाहिजे. समाजाला दहशतवादापासून मुक्त करणे गरजेचे असून, सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे.'

दहशतवाद पसरवण्यासाठी त्यांना समर्थन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत करणारे देश जबाबदार आहेत. 'टेररिज्म फ्री सोसायटी' झालीच पाहिजे. श्रीलंकेत गेलो होतो, तेव्हा दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. दहशतवादाविरोधात एससीओच्या सर्वच देशांनी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक देशाने आपल्या भूभागाला सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मजबूत करणे आवश्यक आहे. हेल्थ केअर, इकॉनॉमिक, पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात काम करावे लागणार आहे. भारत मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी बहुपक्षीय व्यापार प्रणाली गरजेची आहे. अक्षय ऊर्जेचा भारत सहावा आणि सौर ऊर्जेचा भारत पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

यावेळीमोदींनी अनौपचारिक चर्चेसाठी निमंत्रण स्विकारल्याबद्दल चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे आभार मानले. जिनपिंग यांना मोदींनी भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्विकारले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती. यावर्षीच जिनपिंग यांचा भारत दौरा होणार आहे. एससीओ देशांसाठी व्हिसाचे नियम शिथील करण्यात आले असल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली. याशिवाय नूतनीकरणक्षम उर्जा क्षेत्रासाठी भारत घेत असलेल्या मेहनतीवर मोदींनी परिषदेचे लक्ष केंद्रीत केले.

सध्याच्या युगात चांगल्या कनेक्टिव्हिटी (संपर्काची)ची आवश्यकता आहे. 'एससीओ' देशांच्या पर्यटकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी केली जाणार आहे. आमच्यासाठी शांतीपूर्ण आणि समृद्ध अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे. 'एससीओ'मध्ये अफगाणिस्तानच्या विकासाचा रोड मॅप तयार झालेला आहे. मोदींनी जेव्हा दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले, त्यावेळी तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते.

Web Title: SCO Summit PM Narendra Modi Talks Tough On Terror In Message To Pakistan
 


संबंधित बातम्या

Saam TV Live